अस्थमा

News & Events on 20 Mar , 2015

31-x30-asthma

अस्थमा हा काही महाभयंकर असा आजार नव्हे. श्वासोच्छवासाच्या मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्‌वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो.

या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्‌वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एकाएकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्‌वासासाठी त्याला उच्छ्‌वास करण्य़ास लागणार्‍या सर्व स्नायूंची मदत घ्य़ावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्‌भवेल याचाही नेम नसतो.

फुप्फुसे

e0a4a6e0a4aee0a4be-e0a4b6e0a58de0a4b5e0a4bee0a4b8-e0a4b0e0a58be0a497-asthma
माणसाची दोन फुफ्फुसे असून हृदयापुरती जागा सोडून छातीची संपूर्ण पोकळी व्यापून टाकतात. प्रत्येक फुप्फुसावर एक दुपदरी पिशवीचे आवरण असून त्यास ‘फुप्फुसावरण’ प्ल्युराट असे म्हणतात. त्यापैकी बाह्यपदर हा छातीच्या अंतर्भागाला चिकटून असतो व त्याच्याशी संलग्न असलेला फुप्फुसाचा रंग भुरा-करडा असून प्रत्येक फुप्फुसाचे जे लहान भाग होतात त्याचेही पुढे आणखी लहान लहान उपविभाग होऊन प्रत्येकात एकेक वायुवाहिनी शिरलेली असते. या प्रत्येक सूक्ष्म वायू वाहिनीच्या शेवटी गोल आकाराच्या व अत्यंत पातळ अथवा झिरझिरीत आवरणाने बनलेल्या वायुच्या पिशव्या असून त्यांना वायुकोश असे म्हणतात. वायुकोशाच्या भोवती सूक्ष्म केशवाहिन्यांचे जाळे असते व त्यांच्या भिंतींही अशाच झिरझिरीत असल्याने कोशातील प्राणवायु केशवाहिन्यांतील रक्तात सहज शोषला जातो. हा शोषुन विरलेला प्राणवायू मग तांबड्या पेशींतील रंजक द्रव्याद्वारे हिमोग्लोबीन शरीरातील विविध भागांना पुरविला जातो. तसेच, सूक्ष्म केशवाहिन्यांतील कार्बनडाय-ऑक्साईड वायु व पाण्याची वाफ हे वायुकोशात शोषले जाऊन, उच्छ्‌वासावाटे शरीराबाहेर टाकले जातात. प्राणवायु आत घेणे व कर्बधिप्रणित वायु आणि इतर दूषित द्रव्ये बाहेर टाकणे या संयुक्त क्रियेला प्राणवायुप्रदान ऑक्सिजनेशन अशी परिभाषिक संज्ञा असून ही क्रिया श्वासोच्छवासामुळे घडते.

श्वासपटल हा एक घुमटाकार स्नायुमय विभाजक पडदा असून, तो छाती व उदर यांच्या मधे असतो. तो संकोच पावला की, सपाट होऊन छातीचे आकारमान मोठे होते. अशा प्रकारे विस्तार होवून जास्त झालेली मोकळी जागा भरून काढण्यासाठी लवचिक फुप्फुसे विस्तारतात आणि मग फुप्फुसांमध्ये जास्त झालेली पोकळी भरून काढण्यासाठी नाकावाटे हवा फुप्फुसात शिरते. या क्रियेला श्वास असे म्हणतात. याच्या उलट जेव्हा श्वासपटल प्रसरण पावते तेव्हा छातीची पोकळी कमी होऊन फुप्फुसातील हवा बाहेर ढकलली जाते. यास उच्छ्‌वास असे म्हणतात. या दोन्ही क्रिया मिळून श्वासोच्छ्‌वासाची क्रिया होते. दर मिनिटाला सुमारे १६ ते १८ वेळा श्वासोच्छ्‌वास होतो. मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्‌वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो.

या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्‌वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाऐकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एका एकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्‌वासासाठी त्याला उच्छ्‌वास करण्य़ास लागणार्‍या सर्व स्नायूंची मदत घ्य़ावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्‌भवेल याचाही नेम नसतो.