कांजण्या : प्रतिबंध होण्याजोगा रोग!

News & Events on 20 Mar , 2015

chicken-pox
कांजण्या हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून त्यांचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वेकरून हार्पिस झोस्टर या अतिसूक्ष्म जीवाणूमुळे होत असतो.

या विषाणुचा प्रसार खोकताना किंवा शिंकताना बाहेर उडणार्‍या श्लेश्मल द्रावाच्या हवेतून वहन होणार्‍या जलकणांपासून एका व्यक्तिकडून दुसर्‍या व्यक्तिपर्यंत अगदी सहजपणे होत असतो. तसेच याचा प्रसार व्हॅरिसेला किंवा हार्पिस झोस्टर (नागीण) या रोगाच्या जंतुंशी थेट संपर्कात आल्याने सुध्दा होत असतो. या विषाणूंची अंडी उबण्याचा कालावधी दोन ते तीन आठवड्यांचा असतो. अगदी पुरळ उठण्याच्या आधीसुध्दा काही दिवसात अंडी उबवीत असलेल्या व्यक्तिद्वारे या विषाणूंचे प्रसार अगदी सहजपणे होत असते. जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्ति पाणथळ फोडांवरील खपल्या संपूर्ण धरेपर्यंत संसर्गजन्य राहतात.

हे विषाणू शरीरात सुप्तपणे वास्तव्य करून राहतात. कालांतराने हे विषाणू पुन्हा सक्रिय होतात आणि त्यापासून हार्पिस झोस्टर (नागीण) या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. या रोगाच्या विषाणूंचे संवाहन आणि प्रसार फक्त मानवाकडून होत असल्याचे ज्ञात आहे.

कांजण्या येण्याचे प्रकार संपूर्ण वर्षभरात केव्हाही उद्‌भवू शकतात. परंतू या रोगाची साथ मात्र कित्येक अप्रतिक्षम व्यक्तिच्या थेट सहवासात आलेल्या संवाहकाच्या माध्यमातून होत असते.(उदा. कुटुंबे, शाळा, प्रसुती गृहे, कार्यालये इत्यादी) म्हणून जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तिला कांजण्या आल्यास त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तिंना संसर्ग होण्याची अत्याधिक शक्यता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>