क्षयरोग

News & Events on 18 Mar , 2015

tb-cs2

उष्ण कटिबंधात क्षयरोग हा एक मोठ्या प्रमाणावर प्राणघातक ठरलेला आजार आहे. ( मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्सुलोसिस) अतिसूक्ष्म जंतूच्या प्रादूभावाने ह्याची लागण होते. आजारी फुफ्फुसा उत्सर्गजन्य पदार्थाच्या म्हणजेच कफ इत्यादी पदार्थाच्या थेंबामधून दुसर्‍या निरोगी माणसाकडे प्रसार होतो.

निर्जंतुकीकरण न केलेल्या दुधाद्वारे क्वचित त्याचा प्रसार झाल्याचे आढळते. अशावेळी ही लागण मायक्रोबॅक्टेरियम बोवीस या जंतुद्वारे होते. जंतुचा तिसरा प्रकार,मायक्रोबॅक्टेरियम आफ्रिकनम्‌, मध्य आफ्रिकेत आढळून येतो. क्षय रोगाच्या या जंतुचा शोध इ.स. १८८२ मध्ये रॉबर्ट कूच यांनी लावला.

आजारी व्यक्तीला झालेली लागण कोणत्या स्तरावर आहे, त्यावर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता अवलंबून असते. जर व्यक्तीला फुफ्फुसांचा क्षयरोग झाला असेल, आणि बाधित थुंकी-लाळ त्याच्या तोंडावाटे बाहेर पडत असेल, तर जंतुच्या संसर्गाची शक्यता खूपच अधिक असते. इतर अवयवांना क्षय असल्यास तो आजार मूलत: संसर्गजन्य नसतो.

मायक्रोबॅक्टेरियम संसर्गामुळे झालेल्या आजारास मुलांमधील प्राथमिक क्षयरोग नावाने ओळखले जाते. प्राथमिक क्षयरोगाची लक्षण वैशिष्ट्ये अशी आहेत- प्रौढ व्यक्तीला संसर्ग पोहोचल्यास, त्या जंतूना निष्प्रभ ठेवण्यास त्यांना शक्य होते. अशा संसर्ग झालेल्या व्यक्तिपैंकी सुमारे १० लोकांना प्रत्यक्ष आजार होतो व वाढतो. इतर बाधित व्यक्तींच्या शरीरात ते जंतू तसेच निष्प्रभ अवस्थेत राहतात. कुमारवयाच्या उत्तरार्धात आणि प्रौढत्वाच्या सुखातीच्या काळात हा आजार सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो. स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये त्याची लागण अधिक प्रमाणात आढळते.

काही विशिष्ट रोगांनी व्यक्तींना क्षयरोग होण्याची घटना अनेकदा आढळते. ते रोग असे विषाणुंची बाधा, मधुमेह, कॅन्सर-कर्करोग आणि कोळशाच्या खाणीत काम करणार्‍या कामगारांना होणारा सिलीकोसिस नावाचा रोग.