प्रथमेश डायग्नॉस्टिक्सला एनएबीएलचे आंतरराष्ट्रीय मानांकन : उत्तर महाराष्ट्रातील पहिली लॅब

News & Events on 5 Jan , 2015

नाशिक : येथील प्रथमेश ॲडव्हान्स डायग्नोस्टिक्स या संस्थेला नुकतेच केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत काम करणार्या NABL (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) या संस्थेचे राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. अशा प्रकारचे मानांकन मिळविणारी प्रथमेश डायग्नोस्टिक्स ही उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच पॅथॉलॉजी लॅब ठरली असल्याची माहिती प्रथमेश डायग्नोस्टिक्सचे संचालक डॉ. किशोर खोडके व डॉ. सौ. आश्र्विनी खोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्रमाणित होण्यासाठी एनएबीएलच्या विविध आंतरराष्ट्रीय निकषांना पात्र ठरावे लागते. त्यासाठी पॅथॉलॉजी लॅबची रचना, आतील अत्याधुनिक यंत्रसामग्री, काम करणारा कुशल कर्मचारी वर्ग, अचुक निदानाबाबतचे रिपोर्टस, आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवासुविधा, रूग्णांचे केले जाणारे समुपदेशन इत्यादी निकष तपासून पाहिले जातात. मुळातच या सगळ्या निकषांच्या पायावरच उभ्या राहिलेल्या प्रथमेश डायग्नोस्टिक्सने एनएबीएलची मान्यता मिळवून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे. एनएबीएल प्रमाणपत्र हे पॅथॉलॉजीमधील गुणवत्ता व क्षमतेसाठीचं अत्युच्च मानांकन आहे. हे मानांकन मिळालेल्या लॅबचे रिपोर्टस्‌

आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावून स्वीकारले जातात. नमुन्यांचे संकलन करण्यापासून ते चाचणीचे अंतिम अहवाल आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार दिले जातात. त्यातून अचुकता येऊन उपचारांची प्रक्रिया जलद व सोपी होते.
अनेक प्रकारच्या क्लिष्ट चिकित्सांसाठी नाशिकला पूर्वी मुंबई किंवा बंगलोरच्या पॅथॉलॉजी लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. पैशांचा आणि मुख्य म्हणजे वेळेचा प्रचंड अपव्यय होत असे. रूग्णाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत घातक होती. हा विचार करूनच पॅथॉलॉजी लॅबरोटरी सर्व सुसज्ज यंत्रणेसह सुरू केली. आज प्रथमेशच्या पंचवटी, महात्मा गांधी रोड व इंदिरानगर येथे लॅबरोटरीज् आहेत.
एनएबीएल मानांकनाचे औचित्य साधून येत्या ६ ते ८ डिसेंबर दरम्यान प्रथमेशच्या वतीने त्यांच्या पंचवटीत निमाणी बसस्थानकासमोर, इंदिरानगरमध्ये नामको बँकेशेजारी व महात्मा गांधी रोडवरील साठेबाग येथील लॅबमध्ये थायरॉईड तपासणी, हृदययासाठी लिपीड प्रोफाईल तपासणी, मधुमेह व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ही शिबिरे रोज सकाळी ८ ते रात्री ८ अशी तिनही दिवस रोज बारा तास खुली असतील. याबाबत ८७९६८५०८१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. खोडके यांनी केले.