स्वाइन फ्लूची लक्षणे

News & Events on 9 Mar , 2015

swine-flu-700x380

स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश फॅ. पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.

आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे?
फ्लू किंवा साधी सर्दी ओळखण्यासाठी एक खूण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ आगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तेव्र स्वरुपाचे असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तिन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.

आपण फ्लूची लक्षणे व सर्दीची लक्षणे यात तुलना करु शकतो का?
हो. खालील तक्ता आपणास यातील भेद व साम्य स्पष्ट करण्यास मदत करतो.

लक्षणे सर्दी फ्लू
ताप क्वचित १००-१०२ अंश फॅ. तीन ते चार दिवस
डोकेदुखी क्वचित नेहमी
अंग दुखणे हलका प्रभाव सहसा
थकवा, अशक्तपणा सौम्य दोन ते तीन आठवडे
अती थकवा कधीच नाही लवकर व प्रामुख्याने
नाक चोंदणे सर्वसाधारण कधी कधी
छातीत दुखणे सुखा खोकला सर्वसाधारण, कधी कधी तीव्र

आपण केवळ आपल्या लक्षणांच्यासहाय्याने स्वाइन फ्लूचे निदान करु शकत नाही. हंगामी फ्लू व पँडेमिक स्वाइन फ्लू मुलांमधील न्युरॉलॉजिक लक्षणामुळे उद्भवतो. पण हे क्वचितच उद्भवते. पण हंगामी फ्लू त्याच्या लक्षणांप्रमानेच घातक ठरु शकतो.

डॉक्टर रॅपिड निदान पद्धतीचा सल्ला देऊ शतात. पण याचे निदान सकारात्मक झाले तरी आपणास फ्लू नही असे सिद्ध होत नाही. फक्त प्रयोग शाळेत केलेल्या निरिक्षणावरुनच आपणास स्वाइन फ्लू आहे किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकते. स्थानिक आरोग्य विभागात या निदान पद्धती उपलब्ध असतात.

या मुळे कोणाला व कोणता धोका असू शकतो?
स्वाइन फ्लूचा तीव्र प्रभाव झालेल्या व्यक्तींना खाली नमूद केल्याप्रमाणे धोका असू शकतो

 • मोठ्या कालावधीसाठी फूफ्फूसाचे विकार उद्भवतात. ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दम्यावर उपचार घेतले आहेत अशांनाही हा त्रास उद्भवतो.
 • तीव्र हृदयविकार.
 • तीव्र मुत्रपिंडाचे विकार.
 • तीव्र यकृताचे विकार.
 • तीव्र न्युरॉलॉजिकल विकार.

स्वाइन फ्लूचा प्रसार कसा होतो?
नव्या स्वैअन फ्लू विषाणूं तीव्र संसर्ग पसरवतात, याचा प्रसार माणसापासून माणसाला होतो. स्वाइन प्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणा-या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. श्वसन करताना नाकातून किंवा तोंडावाटे याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच अशा बाधित व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणा-या कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती जिथे जिथे स्पर्ष करेल तिथे तिथे संसर्ग होऊ शकतो.

दक्षता कशी घ्यावी?
असे लोक जे खूप आजारी आहेत व ज्यांना स्वाइन फ्लू असण्याची शक्यता आहेत अशांना प्रतिबंधात्मक औषधे दिली जाऊ शकतात व त्यातून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो. अशी औषधे ७०% ते ९०% प्रभावी ठरतात. पण ह्या औषधांचावापर डॉक्टर व त्या व्यक्तीच्या आजाराच्या स्वरुपावर अवलंबून असतात.

स्वाइन फ्लूच्या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी खालील मार्गाचा अवलंब करावा

 • तोंड आणि नाक पूर्णतः झाकून वावर करावा.
 • नाक पुसण्यासाठी टिश्यूपेपरचा वापर करावा.
 • आपले हात वारंवार धूवावेत.
 • टणक पृष्ठभाग असणा-या वस्तू निट पुसून घ्याव्यात. उदा. दरवाज्याच्या कड्या, रिमोट कंट्रोल वगैरे.
 • जर आपणास स्वाइन फ्लू असण्याची शक्यता असेल तर इतरांच्या संपर्कात जास्त जाऊ नये जेणे करुन त्यांना संसर्ग होणार नाही.
 • फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा. त्यामुळे अन्य लोकांना आजाराची लागण होणार नाही.
 • खबरदारी घेण्याच्यासंदर्भात आरोग्य खाते वेळोवेळी ज्या सूचना करेल किंवा आदेश देईल त्याचे पालन करा.
 • डॉक्टरांच्या मते मास्क पेक्षा स्वच्छ हातरुमालाचा वापर फायदेशीर ठरतो.

लक्षात ठेवा

 • नाकातोंडावर मास्क किंवा रुमालाने झाकणे ही सर्वात प्रभावी दक्षता आहे.
 • घरात नियमित आंघोळ किंवा हात पाय धुताना चांगला साबण व स्वच्छ पाणी वापरावे. यामुळे संसर्गाचे प्रमाण ३०% ने होते.
 • आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खावे. फळे व भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.
 • नियमित व्यायाम करावा. यामुळे फ्लूची लक्षणे कमी होतात. जीवनसत्व ब१२ असलेले पदार्थ खावेत.
 • विनाकारणाचा दुरचा प्रवास शक्यतो टाळावा. जर जाणे गरजेचेच असेल तर जिथे तुम्ही जाणार आहात तेथे अशा प्रकारची साथ आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्या.

Swine-flu-info-in-marathi-6

Swine-flu-info-in-marathi-4

Swine-flu-info-in-marathi-3

Swine-flu-info-in-marathi-5

Swine-flu-info-in-marathi-2