थायरॉईड, लिपीड प्रोफाईल व मधुमेह “

News & Events on 15 Dec , 2014

नाशिक : येथील प्रथमेश ॲडव्हान्स डायग्नोस्टिक्स या संस्थेला नुकतेच केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत काम करणार्या NABL (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) या संस्थेचे राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे.
एनएबीएल मानांकनाचे औचित्य साधून येत्या ६ ते ८ डिसेंबर दरम्यान प्रथमेशच्या वतीने त्यांच्या पंचवटीत निमाणी बसस्थानकासमोर, इंदिरानगरमध्ये नामको बँकेशेजारी व महात्मा गांधी रोडवरील साठेबाग येथील लॅबमध्ये थायरॉईड तपासणी, हृदययासाठी लिपीड प्रोफाईल तपासणी, मधुमेह व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ही शिबिरे रोज सकाळी ८ ते रात्री ८ अशी तिनही दिवस रोज बारा तास खुली असतील. याबाबत ८७९६८५०८१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. खोडके यांनी केले.